logo

Office Address

Office No 67/68, Kumar Prestage Point
, Shukrawar Peth, Pune, 411002

Phone Number

+91 93070397392

Cricket Tournament Organized By PCMC Pharmacist CUP

माननीय श्री जगन्नाथजी उर्फ आप्पासाहेब शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त, पी सी एम सी फार्मा कप पर्व ७ वे वर्ष २०२३, डी वाय पाटील क्रिकेट मैदान , आकुर्डी, पुणे या ठिकाणी आयोजित करण्यात आल्या होत्या.

🏏 🏏🏏 आपल्या केमिस्ट संघटनेतील संघटन भावनेचा आदर करून संपूर्ण पुणे जिल्ह्यातून यावर्षी 21 क्रिकेट टीमने यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये क्रिकेट स्पर्धा पार पडली. या क्रिकेट स्पर्धेमध्ये अंतिम फेरीमध्ये धनकवडी वॉरियर्स यांचा विजय झाला. उपविजेते अर्थात रनर-अप डिलिव्हरी बॉईज फायटर पुणे हा संघ ठरला. उत्कृष्ट फलंदाज म्हणून अभिजीत कनगुटकर, उत्कृष्ट बॉलर म्हणून अमित पवार, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक कपिल डांगी, क्रिकेट स्पर्धा मालिकेचा सर्वोत्तम खेळाडू म्हणून अमित पवार, या सर्वांना ट्रॉफी व मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं.

या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा सर्व संयोजकांच्या उपस्थितीत, माननीय सह-आयुक्त श्यामसुंदर प्रतापवार, अन्न व औषध प्रशासन पुणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री रणजीत सावंत, निगडी पोलीस स्टेशन, श्री बच्चुबाई ओसवाल इसी एम एस सी डी ए, श्री सुरेश बाफना माजी अध्यक्ष सी ए पी डी, श्री रवी पवार अध्यक्ष पीसीएमसी, श्री चेतन शिंगवी सेक्रेटरी पीसीएमसी, श्री सचिन धोका पी आर ओ सीएपीडी, श्री कमलेश शिनकर, ईसी सीएपीडी श्री शशिकांत डांगी सहसचिव सीएपीडी, नंदकुमार सांडभोर ईसी सीएपीडी, श्री प्रसाद शितोळे ईसी सीएपीडी,श्री कन्नन नांबीयार हे उपस्थित होते. या क्रिकेट स्पर्धेसाठी श्री अजय दर्डा, श्री प्रवीण मुथा, श्री रवी कटारिया, श्री प्रांजल पाटील, श्री हेमंत उपाध्ये, श्री राहुल शेंडगे, श्री आनंद बाफना, श्री पुनीत सोनीग्रा तसेच सर्व होलसेलर सर्व रिटेलर यांचा उस्फुर्त सहभाग लाभला.

या क्रिकेटचे मुख्य संयोजक श्री संतोष झुबंरलाल खिंवसरा, संस्थापक,अध्यक्ष पीसीएमसी, श्री गणेश धुमाळ इसी सीएपीडी, श्री जयदीप सिसोदिया व श्री दिनेश चौधरी व सर्व पीसीएमसी टीमने उत्कृष्ट आयोजन केले.

या स्पर्धेसाठी श्री विशाल मुरकुटे, श्री मधुकर बच्चे, तुषार कांकरिया, गिरीश बाफना राहुल बंगाळ, दीपक सोनवणे, गोपी साळुंखे, विनेश चूग, विनय गुप्ता, सचिन भंडारी, सुनील शहा, पुनाराम चौधरी, धनेश बोरा, मिथुन बांगर, मयूर देठे, मारुती हाके, अक्षय लुंकड, जितेंद्र खंडेलवाल, प्रभाकर पाटकर, यशवंत तांबे, अमित सोनिग्रा, विवेक बाफना, कुशल शहा, प्रतीक चुत्तर, या सर्व व पीसीएमसीतील सर्व सभासदांचे मोलाचे सहकार्य लाभले. 🏏बाल क्रिकेटर आराध्य धुमाळ याची या स्पर्धेसाठी चारही दिवस पूर्ण उपस्थिती होती.🎾

Request A Call Back

Ever find yourself staring at your computer screen a good consulting slogan to come to mind? Oftentimes.